Published On : Wed, Nov 4th, 2020

सी.ए.रोड, गणेश चौक ते गांधीसागर दरम्यान वाहतूक प्रतिबंधित

सीमेंट रस्ता बांधकामाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गितांजली चौक सी.ए.रोड ते गणेश चौक ते गांधीसागर तलाव पर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गीतांजली चौक सी.ए.रोड ते गणेश चौक ते गांधीसागर पर्यंत सीमेंट रोडचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ३० नोव्हेंबर पर्यंत बंद राहिल.

यामार्गावरील वाहतूक गांधीसागर (वाकर रोड) ते पाचपावली रोड मार्गाने दुतर्फा जाईल. इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात येईल.

Advertisement
Advertisement
Advertisement