Published On : Fri, Sep 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पुलाच्या बांधकामासाठी झाशी राणी चौक ते पंचशील चौकची वाहतूक ४ महिने राहणार बंद !

Advertisement

नागपूर : शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक परिसरात पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे पंचशील चौक येथील नाग नदीवरच्या पुलाचा काही भाग कोसळला होता. या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करणार आहे. याकरिता झाशी राणी चौक ते पंचशील चौक दरम्यानची वाहतूक ४ महिने बंद राहणार आहे.

पुलाचा बांधकामासाठी जवळपास ६ कोटी खर्चाचा अंदाज असनू, याकार्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. पंचशील चौक ते झाशी राणी चौक या दरम्यान नाग नदीवर हा पुल बांधण्यात आला होता. ज्याची १९७४ साली रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली होती.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवरफ्लो झाल्याने नाग नदीला पूर आला आणि या पुरामुळे पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला. आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुलाचे नूतनीकरण करणार आहे. हे काम होण्यासाठी एकंदरीत ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने झाशी राणी चौक ते पंचशील चौकची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.