Published On : Wed, Feb 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

सेंट्रल मॉल ते पंचशिल चौक वाहतूक बंद : नाग नदीवर पुलाचे बांधकाम

मनपा आयुक्तांचे आदेश : ३० एप्रिल २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे रामदास पेठ युनिव्हर्सिटी लायब्ररीजवळ नाग नदीवर पुलाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. सदर कामाकरीता सेंट्रल मॉल ते पंचशिल चौक या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सदर आदेश दि. १ फेब्रुवारी २०२३ पासुन दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामदास पेठ युनिव्हर्सिटी लायब्ररीजवळ नाग नदीवर पुलाचे बांधकाम दरम्यान कल्पना बिल्डींग कडून युनिव्हर्सिटी लायब्ररी कडे येणारा व पुलाच्या बाजूने पंचशिल चौक ते सेंट्रल ‘मॉल कडे तसेच सेंट्रल मॉल ते पंचशिल चौक कडे जाणारा रस्ता दोन्ही बाजुने वाहतूकीस बंद करण्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेले आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement