Published On : Mon, Apr 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बुलढाण्यात भेंडवळची पारंपरिक भविष्यवाणी जाहीर; पावसाबाबत सकारात्मक संकेत, राजकारणावरही भाष्य

Advertisement

बुलढाणा : जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाची पारंपरिक घटमांडणीवर आधारित भविष्यवाणी सोमवारी पहाटे जाहीर करण्यात आली. यंदा पावसाचे एकूण चित्र समाधानकारक राहील, असा अंदाज व्यक्त करतानाच शेती व देशस्थितीबाबतही विविध संकेत देण्यात आले आहेत.

अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जाहीर होणाऱ्या या भविष्यवाणीला सुमारे ३५० वर्षांची परंपरा आहे. राज्यासह इतर भागांतील शेतकरी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून असतात. यंदाही भेंडवळ येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चंद्रभान महाराजांच्या परंपरेतील सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी घटातील धान्य, त्यांची मांडणी व स्थिती यांचा अभ्यास करून अंदाज व्यक्त केला. त्यांच्या मते, जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये सरासरी, ऑगस्टमध्ये चांगला आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

शेतीबाबत बोलताना काही भागात अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात आले. एकूण पीकस्थिती मध्यम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशाच्या आर्थिक व सुरक्षाविषयक परिस्थितीवर भाष्य करताना तिजोरीवर काही प्रमाणात ताण राहू शकतो, असे नमूद करण्यात आले. तसेच शत्रूराष्ट्रांच्या हालचाली वाढण्याची शक्यता असली तरी भारतीय लष्कर सक्षम व सतर्क राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. देशाचा सत्ताधारी राजा कायम राहील, असे संकेतही या भविष्यवाणीत देण्यात आले.

या कार्यक्रमाला बुलढाणा, जळगाव-खानदेश तसेच मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement