Published On : Fri, Sep 13th, 2019

आजनीत तरुणाचा मृतदेह आढळला,

Advertisement

हत्या की आत्महत्या रहस्य अजूनही कायमच

कामठी : -स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या (रडके)आजनी येथिल एका घरावर तरुणाचा मृतदेह आढळला असून या मृत्यू प्रकरणात तरुणाची हत्या की आत्महत्या याचे गूढ रहस्य अजूनही कायम आहे.मृतक तरुणाचे नाव राकेश शंकर उंबरकर वय 24 वर्षे रा.आजनी ता.कामठी असे आहे.

Gold Rate
12 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,40,100/-
Gold 22 KT ₹ 1,30,300/-
Silver/Kg ₹ 2,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा मूळचा भिवापूर तालुक्यातील नक्षी गावाचा राहिवासी असून वयाच्या 5 व्या वर्षापासूनच कामठी तालुक्यातील आजनी गावातील रहिवासी मोठी आई राधाबाई रामभाऊ काकडे कडे वास्तव्यास होता .

तसेच वयाधीन अवस्थेत जुनी ओली कामठी येथील ओम किराणा स्टोर्स येथे नौकर म्हणून कार्यरत होता.काल गणेशोत्सव विसर्जन चा दिवस असल्याने कामावर गेला नव्हता तर आज सकाळी घरमंडळी सकाळी उठल्यावर मृतक राकेश घरात दिसून न आल्याने मृतकाची मोठी आई त्याला बघण्यासाठी घराच्या छतावर गेली असता मृतक हा छताच्या लोखंडि साखळीला एका लहानश्या पांढऱ्या रंगाच्या हातरुमालीने गळा बांधून असून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मृतावस्थेत दिसून आला.

हे दृश्य बघून एकच धक्का बसला दरम्यान या घटनेसंदर्भात ही हत्या की आत्महत्या या चर्चेला अधिकच उधाण आहे.घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनार्थ नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेणदर्भात हत्या की आत्महत्या, मृत्यूचे नेमके कारण काय?याबाबत पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.

संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement