डॉ. नितीन राऊत, सोमवारी दोन ठिकाणी झाल्या सभा
नागपूर: अनेक वर्षापासून पदवीधरांच्या समस्या जैसे थे आहेत. भाजपाने आजपर्यंत त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांना विधानपरिषदेवर निवडून द्या. पदवीधरांच्या समस्यांची त्यांना जाण आहे, असे मत ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस, शिवसेना, पिरिपा ( कवाड़े गट), आरपींआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड.श्री अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या सोमवारी पीडब्ल्यूएस कॉलेज आणि डिस्ट्रीक्ट बार असोसिएशन येथे सभा झाल्या.
पीडब्ल्यूएस कॉलेजमध्ये झालेल्या सभेला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत, सभेला माजी मंत्री अनिस अहमद, पीपल्स वेलफेअर सोसायटी सचिव मोहन वासनिक, यशवंत पाटील, वरंबे साहेब यांची उपस्थिती होती. त्यानंतर अॅड. वंजारी यांची डिस्ट्रीक्ट बार असोसिएशनमध्ये सभा झाली. या सभेला असोसिएशनचे अध्यक्ष कमल सतुजा, सचिव नितीन देशमुख, माजी सचिव मनोज सावजी, शबाना खान, अक्षय समर्थ यांची उपस्थिती होती.
कमल सतुजा यांनी अॅड. वंजारी यांच्या कार्याचे कौतूक करताना त्यांना निवडून देण्याचे सर्वांना आवाहन केले.
