Published On : Fri, Apr 27th, 2018

शहरातील सर्व ॲथलेटिक्स ट्रॅक मनपा दुरूस्त करणार

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे रेशींमबाग मैदान येथील ॲथलेटिक्स ट्रॅकची दुरूस्ती करण्यात आली आहे. नागपुरातील सर्व ॲथलेटिक्स ट्रॅक दुरूस्त करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा समिती नागेश सहारे यांनी दिली.

रेशींमबाग मैदानातील ॲथलेटिक्स ट्रॅक खराब झाला होता. त्यामुळे तेथील खेळाडूंना सराव करण्यास त्रास जात होता. तो ट्रॅक दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी तेथील खेळाडू सातत्याने करत होते. क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष ठिकाणची शुक्रवार (ता.२७) ला पाहणी केली. त्याप्रसंगी त्यांच्यासमवेत जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेशींमबाग येथील ॲथलेटिक्स ट्रॅकवरून सराव करत आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहे. यामध्ये शरद आणि शेखर सूर्यवंशी, रोहिणी आणि मोनिका राऊत, माधुरी गुरनुले, विजया सोनवणे, कल्पना बांते, वसुधा मोरे यांचा समावेश आहे. रेशींमबाग मैदानावर एँथोनी सर, रवी टोळ, मंगेश पौनीकर यांचे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण केंद्र चालतात. याशिवाय पोलिस विभागातील विद्यार्थी, महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे खेळाडू या ट्रॅकवर सराव करत असतात. ट्रॅकच्या नवनिर्माणामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मनपाच्या पुढाकाराने शहरात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचा क्रीडा विभाग व समिती सदैव कटीबद्ध असते. शहरातील सर्व ॲथलेटिक्स ट्रॅक नव्याने तयार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी बोलताना केली.

Advertisement

यावेळी संजू घुमारे, रितेश वैद्य, सोफी शेख, निशांत देहारिया, अनिकेत रामेकर, प्रफुल्ल कोहाड, राहूल कानतोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.