Published On : Sat, Mar 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

इंग्रजी शाळेच्या माध्यमातून मागास भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार

Advertisement

जी.एम.बनातवाला इंग्रजी शाळेचे ना.नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य सुरू आहेत. शहरतील मागास भागात शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी मनपाद्वारे केलेल्या प्रयत्नांना यशही येत आहे, ही आनंदाची बाब आहे. जी.एम.बनातवाला या मागास भागात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी माध्यम शाळेचे लोकार्पण शुक्रवारी (ता.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते.

मंचावर बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, स्थायी समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेविका भावना लोणारे, नगरसेविका नेहा निकोसे, नगरसेवक दिनेश यादव, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शाळेच्या निर्मिती कार्यासाठी मनपाचे कौतुक करीत महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांचे अभिनंदन केले. शहरातील मागास भागात दर्जदार शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्यास येथून विद्यार्थी अनेक क्षेत्रात नावलौकीक करून उत्तम नागरिक बनतील व आपल्या कार्यातून समाज‌ऋण फेडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरात मनपाने शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेची प्रतिपूर्ती करण्याच्या प्रयत्नातून शिक्षण क्षेत्रात अनेकाविध कार्य होत असल्याचे सांगतिले. माजी नगरसेवक मोहम्मद असलम यांनी सदर भागात मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा असावी अशी संकल्पना मांडून त्यादृष्टीने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या निर्मितीमध्ये मोहम्मद असलम यांचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. सत्तापक्ष नेता असताना आपण स्वत: शाळेसाठी ३ कोटी निधीचे प्रावधान करण्याबाबत सहकार्य करू शकलो याचा आनंद असल्याचेही महापौर म्हणाले.

प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी शाळेची निर्मिती प्रक्रिया आणि शहरतील अन्य इंग्रजी शाळांचीही माहिती दिली.

Advertisement
Advertisement