Published On : Wed, Aug 11th, 2021

तिवारी उपाध्याय यांची वीज ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे पूर्व विदर्भ खंडपीठ सदस्य पदी निवड

Advertisement

नागपूर – भारत सरकारच्या भारतीय वीज कायदा, २००३ खाली स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या वीज ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे पूर्व विदर्भ खंड पीठाच्या सदस्य पदी , ग्राहक चळवळ व उपभोक्ता हक्क संरक्षण क्षेत्रात गेल्या २० वर्षा पासून कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.कल्पना तिवारी उपाध्याय निवड करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायद्या खाली स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण उच्चाधिकार परिषदेच्या डॉ. कल्पना तिवारी सदस्य असून आता त्यांचे वर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

लक्षावधी वीज ग्राहक आणि उपभोक्ता हक्क संरक्षण संबंधित स्वतंत्र अश्या ग्राहक तक्रार निवारण मंच/न्यायालयाची विशेष तरतूद भारतीय वीज कायदा, २००३ अनुसार करण्यात आली असून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक क्षेत्रात वैधानिक दर्जा प्राप्त वीज ग्राहक तक्रार निवारण मंच/ न्यायालयाची स्थापना करण्यात साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुढाकार ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रयत्नांनी नियामक आयोग द्वारे सन २०२० मधे वैधानिक नियमन तयार करण्यात आले आहेत. या नियमना अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक क्षेत्रात वीज ग्राहक तक्रार निवारण मंच/न्यायालयाचे खंडपीठ स्थापित करून त्यावर न्यायिक, तांत्रिक आणि ग्राहक उपभोक्ता हक्क चळवळ संबंधीत २५ वर्षापेक्षा जास्त अनुभव प्राप्त उच्च शिक्षा प्राप्त पारंगत व्यक्तींची निवड करण्याची तरतूद त्यात करण्यात आली असून ग्राहक हक्क ब्रीद संरक्षण अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या अधीन या नियुक्त्या उच्चाधिकार समिती द्वारे पारदर्शीपने करण्यात आल्या आहेत .

Advertisement
Advertisement

त्यानुसार आयोगाने नागपूर येथील वीज ग्राहक तक्रार निवारण मंच/न्यायालयाचे पूर्व विदर्भ खंडपीठाच्या सदस्य पदी प्रा. डॉ. तिवारी यांची नियुक्ती केली आहे.

संपूर्ण पूर्व विदर्भाचे कार्यक्षेत्र : लाखो वीज ग्राहक
या खंडपीठाच्या अंतर्गत साडे तीन लक्ष पेक्षा जास्त वीज ग्राहक उपभोक्ता असून नागपूर शहर झोन, नागपूर ग्रामीण झोन अंतर्गत सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय सोबतच पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत ग्राहक व वीज उपभोक्ता असलेले लाखो निवासी व अनिवासी वीज ग्राहक, कृषी व प्रक्रिया उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, पाणी पुरवठा योजना, औद्योगिक कारखाने, वाणिज्यिक प्रतिष्ठाने आणि व्यावसायिक संस्था यांच्या तक्रारी व संमस्यांचे निवारण या अर्ध न्यायिक प्राधिकरणाकडून होणार असुन नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर काम काज करण्यात येईल, तसेच ग्राहकांच्या हिताचे रक्षण, ग्राहकांना त्यांच्या हक्काची माहिती, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक सुकरतेने व त्वरेने व्हावे , वितरण परवानाधारक ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात अपयशी ठरल्यास किंवा त्यास विलंब झाल्यास ग्राहकांकडे देखील त्यावर उपाय असेल याची खात्री हे मंच करील, असे वैधानिक विनियमन द्वारे अधिकार देण्यात आले आहे.

पूर्व विदर्भ खंडपिठावर नवनियुक्त सदस्या डॉ. प्रा. श्रीमती तिवारी या ग्राहक संरक्षण क्षेत्रात दोन दशकांपासून कार्यरत असून त्यांनी “ग्राहक हक्क संरक्षण” या विषयावर अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरीय चर्चासत्रात भाग घेतला असून अनेक नियतकालिकात त्यांचे लेख प्रसारित झाले आहेत. या त्यांच्या कार्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची ग्राहक संरक्षण कायद्याखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यपदी निवड केली होती. कोरोना महामारी त्याकाळात त्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरीय ग्राहकांच्या समस्या सातत्याने उजागर करून पाठपुरावा केलेला आहे.


प्रा.डॉ.तिवारी या राज्य सरकारच्या शेतकरी मिशन चे अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) श्री. किशोर तिवारी आणि जेष्ठ विधीज्ञ व जल प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य बॅरी. विनोद तिवारी यांच्या भगिनी असून त्यांनी ग्राहक संरक्षण शिक्षण शास्त्रात डॉक्टरेट सह अनेक विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले असून ग्राहक पंचायत चे संस्थापक स्व. बिंदुमाधव जोशी, डॉ.विजय लाड, श्यामकांत पात्रीकर, प्रा.नारायण मेहरे यांचे सोबत कार्य केले आहे. राज्यातीलच न्हवे तर संपूर्ण देशात वीज ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या विज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष इंजि. प्रतापराव होगाडे (दाजी) यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले.

नियुक्तीचे सर्व दूर स्वागत
डॉ. प्रा.श्रीमती तिवारी यांचे समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून विदर्भ ग्राहक भारतीचे अध्यक्ष प्रा. पद्माकर देशमुख महल्ले, नागपूर प्रादेशिक विदृत ग्राहक संरक्षण समितीचे शफीक खान पहिलवान, ग्राहक पंचायत चे सर्व श्री.लिलाधर लोहरे, प्रशांत चौधरी, रेखा भोंगाडे, मिलींद खेकाळे, दिलीप चौधरी,अर्चना पांडे, प्रशांत लांजेवार,आशा पांडे, कविता बोबडे , स्वाती वंजारी, डॉ.सुमेधा ठाकुर, वंदना तिवारी यांनी त्यांचे नियुक्तीचे स्वागत केले आहे .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement