Published On : Mon, Aug 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक झाले वाघाचे दर्शन !

Advertisement

नागपूर : शहराजवळील उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक वाघाचे दर्शन झाल्याचे पाहायला मिळाले. गाडीतून जाणाऱ्या काही जणांना हा वाघ दिसल्याने त्यांना त्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या दृष्यामुळे एकीकडे त्या नागरिकांना भीतीही वाटत होती . तर दुसरीकडे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

उमरेड करांडला अभयारण्याच्या लगतच काही नागरिकांना परिसरात वाघ भटकंती करताना दिसून आला. उमरेड करांडला अभयारण्यात वाघ (Tiger) सहजासहजी दिसत नाहीत. मात्र, अचानकी या परिसरात वाघ दिसल्याने पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडे वळू लागली आहेत.

Gold Rate
Mar 17 2026 - Time 10.23Hrs
Gold 24 KT ₹ 1,58,300/-
Gold 22 KT ₹ 1,47,200 /-
Silver/Kg ₹ 2,62,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान राज्यात वाघांची संख्या सतत वाढत असून जिल्ह्यातही वाघांचा आकडा फुगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात वाघांचे दर्शन हमखास होत आहे. यापार्श्वभूमीवर उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानकी वाघ दिसल्याने या घटनेची माहिती नागरिकांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement