नागपूर : शहराजवळील उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक वाघाचे दर्शन झाल्याचे पाहायला मिळाले. गाडीतून जाणाऱ्या काही जणांना हा वाघ दिसल्याने त्यांना त्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या दृष्यामुळे एकीकडे त्या नागरिकांना भीतीही वाटत होती . तर दुसरीकडे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
उमरेड करांडला अभयारण्याच्या लगतच काही नागरिकांना परिसरात वाघ भटकंती करताना दिसून आला. उमरेड करांडला अभयारण्यात वाघ (Tiger) सहजासहजी दिसत नाहीत. मात्र, अचानकी या परिसरात वाघ दिसल्याने पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडे वळू लागली आहेत.
दरम्यान राज्यात वाघांची संख्या सतत वाढत असून जिल्ह्यातही वाघांचा आकडा फुगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वाघांचे दर्शन हमखास होत आहे. यापार्श्वभूमीवर उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानकी वाघ दिसल्याने या घटनेची माहिती नागरिकांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





