Published On : Mon, May 14th, 2018

पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात युवक शेतकरी जागीच ठार

Advertisement
Tiger

File Pic

वर्धा: शेतीचे काम करीत असलेल्या युवा शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात युवक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सेलू तालुक्यातील आमगाव (जं) येथील शेतशिवारात १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

चेतन दादाराव खोब्रागडे (२२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो स्वतःच्या आमगाव (जं) येथील शेतात शेतीचे काम करीत असता कडब्याच्या गंजीत लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात युवक जागीच ठार झाला. घटनेची माहिती सेलु पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. परंतु वनविभागाचा एक ही अधिकारी उशिरापर्यंत न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी जोपर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी येत नाही तो पर्यंत मृतकाच्या शवाला उचलू देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे घटनास्थळी तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.