Published On : Fri, Jan 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील माटे चौकातील पेट्रोल पंपावर गुंडाचा हैदोस; कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

Advertisement

नागपूर: शहरातील माटे चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर आलेल्या काही गुंडांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपींनी पंपावरील कर्मचाऱ्यांना धमकी देत मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी एकजूट होत गुंडाचा सामना केल्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार गुरुवारी संध्याकाळी माटे चौकातील विशाल पेट्रोलियमवर घडला आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास तीन ते चार दुचाकीवर बसून गुंडांची एक टोळी पेट्रोल पंपावर दाखल झाली होती. दारूच्या नशेत असणाऱ्या या गुंडानी पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक दिली. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी काही गुंडांनी चाकूचा धाक दाखवत पंप कर्मचाऱ्यांच्या हातातील पेट्रोल पंपाचे पैसे लुटण्याचाही प्रयत्न केला.

मात्र पेट्रोल पंपावर आलेल्या इतर ग्राहकांनी आरडाओरडा केल्यामुळे हे गुंडानी कर्मचाऱ्यांना धमक्या देत तिथून पळ काढला . ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.