Published On : Fri, Oct 6th, 2017

कृषीमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली कापसाची झाडे, संतप्त शेतकऱ्यांची सरकारविरोधात घोषबाजी


यवतमाळ:
 शेतात फवारणी करत असताना किटकनाशमुळे विषबाधा होऊन जिल्हात 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आज (शुक्रवारी) कृषीमंञी पांडूरंग फुंडकर मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला समोर जावे लागले.

दरम्यान, कृषीमंत्र्यांनी माणोली येथे शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकूण न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर कापसाचे झाडे फेकली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार आणि शेतकरी नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मदन येरावार आणि कृषी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी कृषी राज्यमंञी सदाभाऊ खोत जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांच्यावरही एका शेतकऱ्याने किटनकनाशक फवारण्याचा प्रयत्न केला होता.

आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात बैठक
दरम्यान, आरोग्य मंत्री दीपक सावंत, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आरोग्य विभागाचे आयुक्त व्ही.गिरिराज यावेळी उपस्थित आरोग्य विभागाची बैठक सुरु आहे.