Published On : Mon, Aug 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे साटक येथे वृक्षरोपण करून जनजागृती केली.

Advertisement

– ग्रा प साटक व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाभ.

कन्हान : – तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचाय त साटक यांच्या सयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र,अखिलेश हाइस्कुल, ग्राम पंचायत परिसर व सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात वृक्षारोपण करून जनजागृती करण्यात आली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शनिवार (दि.२३) जुलै ला तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचायत साटक यांच्या सयुक्त विद्यमा ने ग्राम पंचायत परिसर, सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात सरपंचा सौ सीमाताई यशवंतराव उकुंडे, तपस्या फाऊंडेशन रामटेक च्या अध्यक्षा सौ सरिता बीरो, उपसरपंच श्री गजानन वांढरे, श्री मुरलीधर वाडी भस्मे, श्री कृष्णाजी देशमुख, श्री चिंटु वाकुडकर आणि ग्रामस्थाच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हाइस्कुल साटक येथे शालेय विद्यार्थी , शिक्षक श्री प्रदीप निरे, श्री कैलाश हुमने सर, श्री अनमोल मेश्राम सर, जेष्ट नागरिक श्री टेकचंद हिंगण कर, श्री गोविंदा बर्वे, श्री आशीष देशमुख यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

Advertisement

यावेळी तपस्या फाऊंडेशन चे सरंक्षक श्री कैलाश बीरो यांनी जास्तीत जास्त वृक्ष लावुन पर्यावरणाची जोपासना करित आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी बनविण्याचे ग्रामस्थाना आवाहन केले. याप्रसंगी श्री नारायणजी कुंबलकर, श्री रमाकांत मुरमुरे, श्री तरूण बर्वे, श्री प्रमोद मोहनकर, अंकित देशमुख, अक्षय आकरे, अरूण लोढे, निकेश हारोडे, मनोज लक्षणे, जीतु हिंगणकर, श्री बेनीराम बीरो सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री खुबलाल यादव यांनी तर आभार फोटो ग्राफर रामटेकचे श्री आकाश तिवाडे हयानी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.