Published On : Tue, Nov 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पश्चिममध्ये तिरंगी लढत;काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे कोहळे तर अपक्ष म्हणून जिचकार देणार टक्कर !

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहे.यापार्श्वभूमीवर नागपूर पश्चिममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेसचे उमेदवार, भाजपचे जिल्हा प्रमुख सुधाकर कोहळे आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार यांच्यात मोठी लढत अपेक्षित असल्याने राजकीय परिदृश्य आता स्पष्ट झाले आहे. यासह आता एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नरेश बर्डे यांना सोमवारी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राजी करण्यात यश आले आहे. बर्डे यांच्याशिवाय राजेश गोपाळे आणि राजेंद्र तिवारी या दोन अपक्षांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. बर्डे यांनी माघार घेतल्याने सुधाकर कोहळे यांची याठिकाणी ताकद वाढली आहे. तर विकास ठाकरे यांना जिचकार यांच्याकडून मताधिक्य गमवावे लागण्याची शक्यता आहे, ज्यांना काँग्रेसच्या मतांचा मोठा हिस्सा मिळण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत या मतदारसंघातून विकास ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.यंदा या मतदारसंघातून देश जनहित पक्षाचे नीलेश ढोके, जनवादी पार्टीचे अरुण भगत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे डॉ. विनोद रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे यश गुवारखेडे, बहुजन समाज पक्षाचे प्रकाश गजभिये यांच्यासह इतर उमेदवारही रिंगणात उतरले आहेत.

भारतीय युवा जन एकता पार्टीचे मनोज गौरखेडे, भीम सेनेचे यशवंत तेलंग आणि सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) कडून नर्मदा चारोटे. अपक्ष उमेदवार विनील चौरसिया, ॲड. धीरा पझारे, प्रमोद बावणे, राजा बेग, आदर्श ठाकूर, हेमंत पांडे, अलका पोपटकर, सुवास राऊळकर, अनिल बर्डे यांनीही याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.