रामटेक: रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत बिजेवाडा खैरी येथील वार्ड क्र.१ खैरी मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना व नवीन विहीरीचे बांधकाम केले असुन या योजनेला अरोली फिडरवरुन विजपुरवठा सुरु असुन त्यात अनियमितता असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही.
रामटेक येथील ग्रामपंचायत बिजेवाडा खेरी अंतर्गत गाव खैरी हे आदिवासी योजनेत समाविष्ट असुन येथे नागरिकांना पुरेसा व नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना व नवीन विहीरीचे बांधकाम केले.पण सदर योजनेवर नव्यानेच विजपुरवठा जोडणी आवश्यक असतांनी अरोली फिडरवरुन विजपुरवठा होत आहे आणी या फिडरवर दररोज १६-१८ तास लोडशेडिंग असते आणि फक्त रात्री सहा ते आठ तासच विजपुरवठा होत असतो आणि याच पाणी पुरवठा योजनेवरुन बिजेवाडा, खैरी, चारगाव व मनसरमाईन यथे पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे येथील नागरिक अनियमित पाणी पुरवठयापासुन अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत.
यासंबंधी अनेकदा विभागाचे कार्यकारी अभियंता नागपूर यांना ग्रामपंचायत कडून माहीत दिली.पण त्यास अजून ही यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे या सर्व समस्या लक्षात घेऊन खैरी येथील पेयजल योजनेला किटस कॉलेज रामटेक हिवरा रोडवर असलेल्या रामटेक अर्बनच्या डिपीवरुन विज जोडणी द्यावी अशी मागणी जिल्हा कॉंग्रेसचे नेते रामटेक पं.स.माजी उपसभापती उदयसिंग यादव यांचे नेत्रुत्वात विजय पांडे, रणवीर यादव, पप्पू शुक्ला, दिपक डोंगरे, अतुल बंसोड, सतिस कुईटे, विक्की मेश्राम, सत्यम परतेती, पंकज सोमकुवर, ईश्वर डोंगरे, निखिल ठवरे, मनीष घोष, म.रा.वि.कंपणी लि.चे अधिक्षक अभियंता आमझरे याचेकडे मागणी केली. त्यांचेकडून मौका चौकशी करण्याचे आश्वासनही दिले पण अजनपर्यंत नागरिकांना आशेवरच दिवस काढावे लागत आसल्याने पुढील भुमिका घेत उदयसिंग यादव यांनी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना लेखी निवेदन दिले. आता मंत्री काय भुमिका घेणार याकडे परिसरातील त्रस्त नागरीकांचे लक्ष लागले आहे.