Published On : Thu, May 28th, 2020

कामठीत पुणे रिटर्न झालेले एकाच कुटुंबातील तीन सदस्य निघाले पॉजिटिव्ह

Advertisement

आतापर्यंत कामठीत कोरोना बधितांची संख्या 6,
2 कोरोनाबधित झाले बरे तर चार अजूनही कोरोनाबधित

कामठी :-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनेतून 23 मार्च पासून लॉकडाउन सह संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू करुन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत असले तरी नागरिकांच्या संवेदन शून्य वागणुकीमुळे शहरात कोरोनाबधितांची संख्या ही आता वाढीवर असून मुंबई रिटर्न झालेल्या लुंबिनी नगर रहिवासी एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटिव्ह आल्याने हा तरुण कोरोनाबधित आढळल्याचे घटनेला आठवडा ही लोटला नाही तर पुणे रिटर्न झालेले मेन रोड गुरुनानक नगर रहिवासी एकाच कुटुंबातील पती ,पत्नी व एक मुलगा असे तीन सदस्य कोरोनाबधित आढळल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान निदर्शनास आली असून

या तिन्ही कोरोना बाधित सदस्यांना नागपूर च्या मेडिकल कॉलेज संस्थात्मक विलीगिकरण कक्षात पाठविण्यात आले तसेच यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या घरातील मोलकरिण , व इतर सदस्य अशा 9 सदस्यांना सुद्धा विलीगिकरंण कक्षात हलविण्यात आले .यानुसार आतापर्यंत च्या कोरोनाबधित आढळलेल्या सदस्यांची संख्या ही 6 असून यातील लुम्बिनी नगर येथील रहिवासी असलेले एक दिल्ली रिटर्न व तहसील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले व भिलगाव रहिवासी पोलीस कर्मचारी संस्थात्मक विलीगिकरंण कक्षात ठेवल्या नंतर या दोघांचे रिपोर्टनुसार हे दोन्ही कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही फक्त चार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दिल्ली रिटर्न झालेले 39 वर्षीय पती, 36 वर्षोय पत्नी व 6 वर्षीय मुलगा हे 25 मे ला कामठी त आले असता त्यांनी कामठी आल्याची माहिती प्रशासनाला दिल्यावरून त्यांना त्वरित कामठी कळमना मार्गावरील एका खाजगी सभागृहात विलीगीकरण ठेवून 26 मे ला नागपूर च्या आमदार निवास येथे नेऊन कोरोना चाचणी तपासणी केली असता आज आलेल्या अहवालात हे तिन्ही सदस्य पॉजिटिव्ह आढळल्याने सर्वाना एकच धक्का बसला यावेळी तहसिलदार अरविंद हिंगे, नायब तहसिलदार रणजित दुसावार, मुख्याधिकारी रमाकांत डाके,पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, एपीआय शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी यासह इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्वरित कोरोणाबधित आढळलेल्या त्या तीन सदस्यांच्याया निवास स्थान असलेल्या गुरुनानक नगर परीरसरात पोहोचून तो परिसर प्रतिबंधित करून परिसर निर्जंतुकीकरण करून प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या त्या नऊ सदस्यांना सुदधा नागपूर येथे संस्थात्मक विलीगिकरंन कक्षात हलविण्यात आले.

बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रशासना तर्फे खबरदारी घेत त्याना त्वरित नजीकच्या विलीगीकरण कक्षात ठेवुन त्यांची कोवोड तपासणी करण्यात येत आहे यानुसार मागील काही दिवसापूर्वी बाहेरून आलेल्या 73 लोकांची तपासणी करण्यात आली होती त्यातील एकमेव मुंबई रिटर्न असलेला लुम्बिनी नगर रहिवासी 24 वर्षीय तरुण कोरोनाबधित आढळला तसेच आता शहरातील 20 तर ग्रामीण भागातील 13 लोकांची कोरोना चाचणी तपासणी करण्यात आली त्यातील पुणे रिटर्न झालेले एकाच कुटुंबातील असलेले व गुरुनानक नगर रहिवासी असलेले तीन सदस्य कोरोनाबधित आढळले तर गृह विलीगीकरण असलेले शहरातील 294 व ग्रामीण भागातील 308 असे एकूण 602 नागरिक हे होम कोरोनटाईन आहेत हे इथं विशेष!