Published On : Mon, Apr 24th, 2017

नागपूर सुधारगृहातून पळालेल्या तिन्ही मुली सापडल्या!

Nagpur
नागपूर :
नागपूरमधील सदर भागातील महिला सुधारगृहातून पळालेल्या चार मुलींपैकी तीन मुलींचा शोध लागला आहे. डम्पिंग यार्ड परिसरातून या तिघींनाही ताब्यात घेण्यात आले.

20 एप्रिल रोजी नागपूरच्या सदर भागातील महिला सुधारगृहातून चार मुलींनी पळ काढला होता. त्यातील एका अल्पवयीन मुलीवर सुगत नगरमधल्या पडक्या इमारतीत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. उर्वरित तीन मुली सापडल्या नव्हत्या. त्यांचा अखेर शोध लागला आहे.

आज (24 एप्रिल) दुपारी डम्पिंग यार्ड परिसरातून तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुधारगृहातून पळालेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरमधील महिला सुधारगृहातून 4 मुली पळाल्या होत्या. त्यातील एकीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. चार पैकी तीन मुली वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या आणि पीडित मुलगी एकटी सीताबर्डी परिसरात भटकत राहिली. त्यावेळी त्याच भागातल्या तीन फेरीवाले आणि एका रिक्षा चालकाने दुष्कृत्य केलं.

बलात्कारानंतर पीडित मुलीला दुसऱ्या दिवशी सीताबर्डी परिसरात आणून सोडलं. तेव्हा स्थानिकांनी तिला पोलिस स्टेशनमधे नेऊन सोडलं. त्यानंतर पीडितेने महिला सुधारगृहाच्या अधिक्षिकेला बोलावलं आणि सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, पळालेल्या इतर तीन मुली अजूनही बेपत्ता होत्या. त्यांना अखेर पोलिसांनी शोधले आहे.