नागपूर : चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत जिल्हा बाल संरक्षण पथकाने बुधवारी शहरातील विविध ठिकाणांवरून तीन बालमजूरांची सुटका केली. यामध्ये दोन मुलगे आणि एका मुलीचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही कारवाई कडबी चौकाजवळील रेल्वे म्युझियम परिसरात करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित तिन्ही मुले मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले.
सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना तत्काळ समुपदेशनाची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित नियोक्त्यांविरुद्ध ‘बालमजुरी (प्रतिबंध व नियमन) कायदा’ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बालमजुरीसंदर्भात कुठेही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धाडाडे आणि मंगला कुंभारे उपस्थित होते.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





