Published On : Sun, Nov 29th, 2020

अॅड. वंजारींशी साधला युवाशक्‍तीने लाइव्‍ह संवाद

Advertisement

संपूर्ण विदर्भातून हजारो पदवीधरांचा भरघोस प्रतिसाद

Adv. Abhijeet Wanjari interacted with graduates from Vidarbha through Facebook Live on Sunday.

नागपूर: महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनी रविवारी फेसबुक लाइव्‍हच्‍या माध्‍यमातून युवाशक्‍तीशी थेट संवाद साधत त्‍यांच्‍या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. संपूर्ण विदर्भातील हजारो पदवीधरांनी या फेसबुक लाईव्‍ह कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र विधान परिषद नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूक प्रचाराचा रविवारी हा शेवटचा दिवस होता. कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरिपा ( कवाड़े गट), आरपींआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी उमेदवारी जाहीर झाल्‍यापासून सहाही जिल्‍ह्यातील तालुके, विधानसभा क्षेत्रात जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. सर्वत्र त्‍यांना पदवीधर मतदार संघातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक संघटनांनी त्‍यांना समर्थन जाहीर करत ‘अॅड. वंजारी आगे बढो, हम तुम्‍हारे साथ है’ चा नारा लावला आहे.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कॉंग्रेस अध्‍यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आशीर्वाद लाभलेल्‍या अॅड. अभिजीत वंजारी यांनी प्रचाराच्‍या शेवटच्‍या दिवशी सोशल माध्‍यमाचा वापर करून युवाशक्‍तीला आवाहन केले. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्‍या या लाईव्‍ह कार्यक्रमात संपूर्ण विदर्भातून हजारो पदवीधर जोडले गेले. या कार्यक्रमाला तीनशेहून अधिक शेअर मिळाले तर लाखो लोकांनी पसंती दर्शवली. शंभराहून अधिक पदवीधरांनी अॅड. वंजारी यांनी लाईव्‍ह प्रश्‍न विचारले. शेवटच्‍या अर्ध्‍या तासात झालेल्‍या या मॅराथॉन प्रश्‍नोत्‍तराच्‍या सेशनला अॅड. वंजारी यांनी समाधानकारक उत्‍तरे दिली.

Advertisement
Advertisement