Published On : Sat, May 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

“हैदराबादेत हजारो नागरिक योग उत्सवात सामील”

Advertisement

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवस उलट गणतीचे (कॉउंटडाउन) औचित्य

हैदराबाद/नागपूर : तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्याराजन यांनी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत दिनांक २७ मे २०२२ रोजी हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवसांच्या उलट गणती (काउंटडाउन) कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर राज्ये विकास मंत्री, जी किशन रेड्डी; राज्यमंत्री महेंद्र मंजुपारा (आयुष मंत्रालय), आयुष मंत्रालयाच्या सहसचिव, कविता गर्ग; डॉ. ईश्वर बसवराद्दी, संचालक – मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान (MDNIY) आणि प्रख्यात योग गुरु, चित्रपट तारे, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, सेलिब्रिटी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने योगप्रेमी, विद्यार्थी व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.

भारताची सनातन योग संस्कृती आणि तिचे फायदे तळागाळात सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनांक २१ जूनपर्यंत देशभरात ‘१०० दिवस, १०० शहरे, १०० संस्था’ या मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे नियोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.