Published On : Tue, May 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील ‘ते’ दोन पोलीस कर्मचारी निलंबित; ट्रेनमध्ये सहकारी महिला कर्मचाऱ्याशी केले होते आक्षेपार्ह वर्तन!

Advertisement

नागपूर : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी कर्तव्य कसूर गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. युवराज राठोड व आदित्य यादव यांना निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

माहितीनुसार, युवराज राठोड व आदित्य यादव यांनी पुणे जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी पाठविण्यात आले होते.यादरम्यान विविध पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी रेल्वेने पुण्याला जात होत्या. यावेळी दोघांनी मद्य प्राशन केले व रेल्वेच्या डब्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.नशेत त्यांनी सहकारी महिला कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला.

पीडित महिला कर्मचाऱ्याने जीआरपीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापताच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना नागपुरात बोलावण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दोघांनाही निलंबित केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.