Published On : Sun, May 31st, 2020

हीच खरी मानवता, अशी संधी पुन्हा नाही – दात्यांची मदत अन् उपासकांचे श्रम

Advertisement

नागपूर: लॉकडाऊन काळात गरीब, गरजू, निराधार, बेघर आणि मजुरांना घरपोच जेवणाचे डबे पाठवून त्यांच्या पोटाची भूक भागविली. ज्यांचे पोटच हातावर आहे, अशा संकटात सापडलेल्या माणसाला मदतीचा हात दिला. राष्ट्रावर आलेल्या संकटात हीच खरी मानवसेवा आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. नि:स्वार्थपणे केलेल्या या कार्याला मानवतेची जोड आहे.

बौद्ध धम्मगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात इंदोरा बुद्धविहार कमिटीच्या सदस्यांनी शहरातील दात्यांच्या भरवशावर मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. १० एप्रिलपासून सुरू झालेली ही मदत ५० दिवसांनंतरही कायम आहे.

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन काळात संपूर्ण देशच थांबला. संक्रमण थांबविण्यासाठी उद्योग, व्यवसाय बंद ठेवणे गरजेचे होते. अशा वेळी गरिबांसमोर जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भदंत ससाई यांच्या मार्गदर्शनात इंदोरा बुद्धविहार कमिटीचे सचिव अमित गडपायले यांच्या प्रयत्नाने शहरातील शेकडो दात्यांनी मदतीचा हात पुढे केला.

इंदोरा, येथील नालंदा वसतिगृहात सकाळ व सायंकाळ भोजन तयार होत आहे. भौतिक दूरत्व राखून आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करून जेवणाचे डबे तयार केले जात आहे. सकाळ व सायंकाळ असे एकूण जवळपास ८ हजार डबे तयार करून बुद्धविहाराच्या वाहनाने शहरातील झोपडपट्टी भागात घरपोच पाठविले जात आहेत. झोपडपट्टीत राहणाèया लोकांची यादीच तयार करण्यात आली आहे. यादीनुसार त्यांना घरपोच जेवण दिले जात आहे.

यासोबतच नालंदा वसतिगृहासमोर शेकडो लोकांना जेवण दिले जाते. तसेच श्रमिक विशेष रेल्वे गाडीतील सर्व प्रवाशांना आणि गरज असलेल्या ठिकाणी भुकेल्यांना जेवण दिले जात आहे. यासाठी जवळपास ५० लोकांची चमू तयार करण्यात आली आहे. विविध समित्या तयार करून वेगवेगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. समाजापुढे आदर्श उभा करणाèयांनो मदतीचा ओघ असाच सुरू ठेवा हीच खरी मानवसेवा आहे. अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही, अशी भावना ससाई यांनी व्यक्त केली.

मदत करणाèया पथकात विहार कमिटीचे सचिव अमित गडपायले, अरुण नागदिवे, नितीन गणवीर, अ‍ॅड. अजय निकोसे, आनंद राऊत, संदीप कोचे आणि विक्रांत गजभिये यांच्यासह भंते प्रज्ञाबोधी, भंते नागानंद, भंते सुधानंद, भंते धम्मप्रिय, भंते मिqलद आणि भंते भद्रशील, तसेच श्रम करणाèया कार्यकत्र्यात जगन तायडे, राहुल डोंगरे, दमयंती चकमा, नागकन्लीनी मनाव, रीमा चकमा, रंजिता बरुवा, शिखाचरणी चकमा, ममिता चकमा, मोनीता चकमा, जीना चकमा, सुलेखा चकमा, प्रोतिभा चकमा, पूजा भजनकर आणि नेहा भजनकर, यांच्यासह मुकेश उके, नितेश गोंडाणे, सुहास राऊत, निशिकांत शेंडे, राजेश ढोक, पी. एम. वासनिक, विकास पराते, अमित हुमने, बाबा डोंगरे, हर्षल राऊत, विशाल ढवळे, रोशन डोंगरे, शंकर जाटव, कपिल खोब्रागडे, किशोर डोंगरे, निशाद इंदूरकर, मंथन टेंभुर्णे, अनंत नादगावे, दीपक गडपायले, तेजस जनबोधकर, आकाश जनबंधू, निखिलेश मेश्राम, सोनल राऊत, राहुल इंदूरकर, सुभाष वाघमारे, लालू टेंभुर्णे, हर्षल कोटांगले, आशीष हाडगे, अभिषेक धुर्वे, गौरव शाहू, सूरज चौधरी, अमित चौधरी, रितेश श्रीवास आणि जेवण तयार करणाèयात जोत्स्ना मेश्राम, नीलु रंगारी यांचा समावेश आहे.
….