नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही नवीन काय सांगताय, ही तर जुनी न्यूज आहे, ही आजची न्यूज थोडी आहे, असे उत्तर दिले.
दरम्यान इंदापूरमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले, जनतेनं उठाव झाला आणि त्यांनी तुतारी हातात घेण्यास सांगितलं.
राजकारणात असे पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. तसेच शरद पवार यांनी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.