Published On : Mon, Apr 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

…अशी भागविली जाते शहराची तहान! नगरसेवकांनी केला जलशुद्धीकरण केंद्राचा अभ्यास दौरा

शहराला पाणी पुरवठ्यातील अडचणी जाणून घेतल्या
Advertisement

नागपूर, ता. 20: शाश्वत विकासाच्या वाटेवर असणाऱ्या नागपूर शहराला पाणीपुरवठा कसा होतो, त्यासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  संपूर्ण शहराची तहान कशी भागविली जाते याची संपूर्ण माहिती आज(ता.२०) नगरसेवकांनी जाणून घेतली. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वपूर्ण पेंच जलशुद्धीकरण केंद्र टप्पा-4 (गोधनी) आणि कन्हान जलशुद्धीकरण केंद्र यांची पाहणी महापौर निता ठाकरे यांच्या नेतृत्त्वात उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, सत्तापक्ष श्री. नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे,  जलप्रदान विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, उपसभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी केली.

जलशुद्धीकरण केंद्र कशाप्रकारे कार्य करते आणि शहराला पाणी पुरवठा कसा होतो, नगरसेवकांनी जाणून घ्यावे, या उद्देशाने महानगरपालिकेतर्फे हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. सर्व समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, श्रीमती सरिता कावरे, श्रीमती अश्विनी जिचकार, श्रीमती मनीषा अतकरे, श्रीमती संतोष देवी लढ्ढा, श्रीमती रुतिका मसराम, श्रीमती दर्शनी धवड, यांच्यासह शिवसेनेचे गटनेते श्री. गणेश चार्लेवार, एआय एमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल, मुस्लीम लीगचे श्री. असलम मुल्ला  यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहराला पाणी  पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरणाची प्रकिया आणि अडथळे यावेळी माननीय नगरसेवक यांनी या अभ्यास दौऱ्यात समजून घेतले. सर्वप्रथम 115 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या पेंच जलशुद्धीकरण केंद्र टप्पा -4गोधनी ला या अभ्यास दौऱ्यात भेट देण्यात आली.  यावेळी केंद्रातील स्काडा (SCADA) रूम, फिल्टर पंप, प्लँट ट्रीटमेंट, कॅसेकेटर, क्लोरीन इमारत, क्लीन वॉटर पंप आणि डेमो प्लँटची पाहणी करून नगरसेवकांनी प्लँटची क्षमता व तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर 240 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. कन्हान नदीतून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तयार केलेल्या दोन इनटेक विहिरींची पाहणी महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाण्याचे पंपिंग करताना येणाऱ्या अडचणींची माहिती यावेळी घेण्यात आली. तसेच पेंच टप्पा 1, 2व 3 आणि गोरेवाडा येथून होणाऱ्या पाणी पुरवठ्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या  अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिले.

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, “शहरात पाणी पुरवठा कसा केला जातो हे  नगरसेवकांना कळावे, यासाठी हा दौरा आयोजित केला होता. ट्रीपिंगची समस्या आणि पावसाळ्यातील कन्हान नदीचा पूर यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत, जेणेकरून ते नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगू शकतील. यावेळी त्यांनी पाण्याच्या टाक्यांच्या पाणी पातळीची माहिती नगरसेवकांना थेट देण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व टाक्यांवर फ्लो-मीटर लावण्यात यावे, मुख्यालयातील ओसीडब्ल्यूने डॅशबोर्ड सुरू करावा आणि पाणी पुरवठ्याच्या अपडेट माहितीची जुनी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशा सूचना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी जलप्रदाय समिती व ओसीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले की, ट्रीपिंग आणि पुरामुळे अनेकदा शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येतो. यामुळे समस्यांची माहिती नगरसेवकांमार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा होता.

 

विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर म्हणाले की, सर्व नगरसेवकांसाठी हा अभ्यासपूर्ण दौरा होता. शहराला पाणी पुरवठा करताना येणाऱ्या अडचणीची माहिती नगरसेवकांमार्फत नागरिकांना चांगल्या रीतीने माहिती मिळेल. येणाऱ्या दिवसात सर्वाना पाणी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दौऱ्यात मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आणि कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर उपस्थित होते.

 प्रकल्पाची माहिती :

 नागपूर शहर पाणी पुरवठयाचे स्त्रोत, कच्चे पाणी उचल जलशुध्दीकरण प्रक्रिया व पिण्यास योग्य पाण्याचा नागपूर शहरास पुरवठाबाबत संक्षीप्त माहिती.

शहराचा पाणीपुरवठा

 

नागपूर शहरास खालीलप्रमाणे स्त्रोतातुन पाणीपुरवठा होतो.

अनु.क्र.           स्त्रोत मंजुर वार्षीक आरक्षण

 

  1 कन्हान नदी 65.71
  2 पेंच जलाशय नवेगांव खैरी, ता. पारशिवनी
अ) विस्तृत प्रकल्प अहवालानुसार 112.00   दलघमी
 ब) तात्पुरता स्वरुपात पुढील आदेशापर्यत 78.00    दलघमी
255.71  दलघमी

 

कन्हान नदी :- नागपूर शहरापासून अंदाजे 18 कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 छावणी परिषद कामठी स्थित कन्हान नदीवर, नदीच्या पात्रात-4 आंतरग्राही विहिरी व 3 पंप हाऊसद्वारे कच्च्या पाण्याची उचल करण्यात येते. सध्या येथुन 210 ते 225 दलली प्रतीदिन या दराने पाण्याची उचल करण्यात येते. आवश्यकतेनुसार येथुन उचल करण्यात येणाऱ्या पाणी मात्रेत बदल (वाढ) करण्यात येतो. साधारणत: जानेवारी, फेब्रुवारी पासून नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मोठया प्रमाणात घट दिसुन येते व शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याकारीता पेंच जलाशयातील पाणी पेंच उजव्या कालव्यापर्यत कन्हान नदीत सोडण्यात येते. पेंच जलाशयात पाणी उपलब्ध नसल्यास इतर स्त्रोतामधून पाणी आणावे किंवा शहराच्या पाणीपुरवठयात कपात करावी लागते.

 

पेंच जलाशय नवेगाव खैरी :- पारशिवनी तालुक्यात नवेगांव खेरी येथे जलसंपदा विभागाचे जलाशय आहे. या जलाशयातुन पाण्याची उचल करण्याकरीता पेंच प्रोजेक्ट कक्ष, म.न.पा. यांनी अंतर्गाही विहिर व पंप हाऊसची उभरणी केली असुन मार्च 2015 पासुन या पंपहाऊस पासून जवळच असलेल्या टेकडी वरील BPT मधे पाणी पूरवठा होतो. BPT पासून 2300 मी.मी. व्यासाच्या पोलादी गुरुत्व पाईपचे पेंच जलशुध्दीकरण केंद्र टप्पा 1, 2, 3 गोरेवाडा व टप्पा 4 गोधनी येथे पाणीपुरवठा होत आहे. सदर्हु पंप हाऊसचे संचलन व दुरुस्तीची कामे मनपा तर्फे करण्यात येतात. येथून उचल केलेले पाणी वर नमुद जलशुध्दीकरण केंद्रास पुरविण्यात येते व अतिरिक्त पाणी गोरेवाडा, संतुलन जलाशयात (गोरेवाडा तलाव) साठविण्यात येते.

         जलशुध्दीकरण केंद्र  :-  म.न.पा. ची जलशुध्दीकरण केंद्रे, निर्धारीत क्षमता व सध्या पाणीपुरवठा खालीलप्रमाणे

अनु.क्र. जलशुध्दीकरण केंद्राचे नाव निर्धारीत क्षमता दलली प्रतीदिन पाणीपुरवठा दलली प्रतीदिन
1 कन्हान जलशुध्दीकरण केंद्र, छावणी परिषद कामठी 240 220
2 पेंच जलशुध्दीकरण केंद्र टप्पा -1 गोरेवाडा, नागपूर 136 132
3 पेंच जलशुध्दीकरण केंद्र टप्पा -2 गोरेवाडा, नागपूर 175 153
4 पेंच  जलशुध्दीकरण केंद्र टप्पा -3 गोरेवाडा, नागपूर 120 118
5 पेंच  जलशुध्दीकरण केंद्र टप्पा -4 गोधनी 115 112
                                                            एकूण 786 735

  उपरोक्त जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पिण्यास योग्य अशा पाण्याचा शहरातील विविध MBR/GSR/ESR ला पुरवठा होतो व नंतर वितरण प्रणाली मार्फत

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement