
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरुवात झाली असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इतकंच नाहीतर राष्ट्रवादीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व या मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना तिकीट मिळाले आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मला उमेदवारी मिळणं हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनिक दिवस आहे. या कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा आभारी आहे. मला वांद्रे पूर्वेचे तिकीट मिळाले आता मला खात्री आहे की सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी वांद्रे पूर्व येथून नक्कीच निवडणूक जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांनी मोठा दावा केला की, पैशासाठी माझ्या वडिलांची हत्या केली. आम्ही दोघेही निशाण्यावर होतो, मात्र वडिलांनी मला वाचवले, असा दावा झिशान यांनी केला. तसेच काँग्रेस आणि शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दबावाखाली काम करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...
सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार




