Published On : Tue, Oct 31st, 2023
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस! चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका

Advertisement

मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रभरात जो घोळ निर्माण झाला असून त्याचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहे, त्यासाठी केवळ उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीमुळे महाराष्ट्राला आज हे दिवस पाहावे लागत आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यावेळी अस्तित्वात असलेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडता आली असती परंतु, तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर श्री बावनकुळे म्हणाले, ही आगच उद्धव ठाकरे यांनी लावली आहे. हा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टात होता तेव्हा वडेट्टीवार त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यास सर्वांनी साथ दिली पाहिजे.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री बावनकुळे म्हणाले की, भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आहेत. जे प्रयत्न केले जात आहेत, त्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे निश्चित करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपा सरकारला पूर्ण सहकार्य करेल. सरकार जो निर्णय घेईल त्यास भाजपा पूर्ण पाठिंबा देणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.