Published On : Fri, Mar 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, केवळ 9 जणांचा समावेश

नवी दिल्ली:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून (BJP) पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात असून एखाद्या नेत्याची जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच भाजपकडून संबंधित नेत्याला तिकीट दिल जात आहे. भाजपने याआधी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आता भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या सर्व जागा या तमिळनाडू राज्यातील आहेत. यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश आहे. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी महाराष्ट्राती भाजपचे नेते विनोद तावडे यांनी जाहीर केली होती.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या यादीत देशभारीतल वेगवेगळ्या 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यात सध्या मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या 34 मंत्र्यांचा समावेश होता. भाजपने आपल्या पहिल्या यादीत एकूण 28 महिला नेत्यांनाही तिकीट दिलेले आहे. तर भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे होते.

यामध्ये नितीन गडकरी यांच्यासह, पीयुष गोयल, अनुगार ठाकूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल ठक्कर, रविंद्रसिंह रावत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता.

Advertisement
Advertisement