Published On : Mon, Aug 16th, 2021

तृतीयपंथीयांचे तीन दिवसीय ध्यान परीचय शिबीर संपन्न

Advertisement

नागपुर – “पीपल टू पीपल सोसायटी ” द्वारा आयोजीत कार्यक्रमात तृतीयपंथी उपस्थित समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याच्या आणि या घटकांमध्ये आत्मविश्वास जागविण्याच्या उद्देशाने हयुएन त्सँग शिबीर केंद्र , बोरधरण येथे तृतीयपंथीयांचे तीन दिवसीय ध्यान परीचय शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात तृतीयपंथीयांच्या सर्वागीण विकास आणि समाजाचा त्यांचेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलने हा उद्देश लक्षात घेउन विविध उपक्रम राबविण्यात राबविण्यात आले. नागपूर परिसरातील पंधरा तृतीयपंथीयांनी शिबीरात भाग घेतला.

तृतीयपंथीयांच्या गुरू मां शनाया यांच्या गटातील या शिबीरार्थीना ध्यान साधना व दैनंदीन जीवनात नीतीमत्तेचे महत्व विषद करण्यात आले. शिवाय चर्चा गटे निर्माण करून सविस्तर व सखोल चर्चाही करण्यात आली. या शिबीराचे नेतृत्व धम्मचारी कुमारजीव व धम्मचारी तेजधम्म यांनी केले.

या शिबीराचे नेतृत्व धम्मचारी कुमारजीव व धम्मचारी तेजधम्म यांनी केले. शिबीराच्या समारोपाला तृतीयपंथीयांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून आपणही सकल समाजाचे एक अविभाज्य घटक आहोत याची प्रचीती आणून दिली. आपण समाजापासून वेगळे नाहीत, नैसर्गीक दृष्टया वेगळेपण असले तरी शेवटी आपले भावविश्व इतरां सारखेच असते अशा भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या तसेच यापुढेही जास्त दिवसांचे शिबीर आयोजीत करण्याची विनंती गुरूमा शनाया यांनी संस्थेला केली.

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा अनुश्री खोब्रागडे, धम्मचारी सुचिकीर्ती, सारीका पाटील, धम्मचारी अंशूलरत्न, धम्ममीत्र दिक्षांत मेश्राम, बोरधरण येथील कुल चमू आणि संजीवनी संस्कार संस्थेच्या सुषमा नागरे कांबळे, संस्थेचे संस्थापक धम्मचारी तेजधम्म यांनी मोलाचे सहकार्य केले.