Published On : Sat, Oct 28th, 2017

Indian Idol चा गायक निघाला अट्टल गुन्हेगार; तायक्वांदो स्पर्धेत पटकावले गोल्ड मेडल

Advertisement

मुंबई/नवी दिल्ली: सूरज ऊर्फ सूरज फायटर याला कदाचित तुम्ही ओळखत असाला. तो ‘इंडियन आयडल’मध्ये ‍झळकला होता. तायक्वांदोमध्ये एकदा नव्हे दोनदा गोल्ड मेडल पटकावले. इतकेच नाही तर तो अस्खलित इंग्रजीही बोलतो. परंतु त्याला दिल्ली पोलिसांनी गजाआड केले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे सत्य आहे.

मुंबईतील रहिवासी असलेला सूरज कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. परंतु महागडे व्यसन आणि ऐशोआरामात जगण्याची सवय त्याला जडल्याने तो आज अट्टल गुन्हेगार बनला आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दिल्ली पोलिसांनी सूरजला त्याच्या एका साथीदारासोबत रणहोला भागात झालेल्या एका चोरीच्या घटनेत अटक केली. तो 14 दिवसांपूर्वीच तुरूंगाबाहेर आला होता. सूरजविरोधात दिल्लीतील विविध पोलिस स्टेशनमध्ये चोरीची तब्बल 24 गुन्हे दाखल आहे.

सूरजचे वडील मुंबई हायकोर्टचे वकील
सूरजचे वडिल वकील असून ते मुंबई हायकोर्टात वकीली करतात. परंतु महागडे छंद आणि लॅव्हिश लाइफ स्टाइलमुळे सूरजने गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल केली आणि त्याने आतापर्यंत अनेक चोर्‍या केल्या.

पोलिसांनी सांगितले की, सूरजच्या कारनाम्यांमुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला परिवारातून बेदखल केले आहे. तरी देखील सूरजने चोर्‍या करणे सुरुच ठेवले.

Advertisement
Advertisement