विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर: शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍याचा, महिलांचा आणि गावांचा विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-शिवसेनेच्या शासनाने या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि गावांच्या विकासासाठी निधी दिला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कोंढाळी येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, शेषरावजी चाफले, घनश्याम गंधी, श्यामराव तायवाडे, डॉ. हरिभजन धारपुडे, योगेश चाफले, यादवजी बागड, प्रल्हाद बालपांडे, बालकृष्ण पालीवाल, योगेश गोतमारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- भाजपा-शिवसेनेच्या शासनामुळेच आज नागपूर जिल्हा नियोजन समिती 778 कोटींची झाली आहे. काँग्रेसच्या काळात या जिल्ह्यातील 70 लाख लोकसंख्येच्या विकासासाठी फक्त 220 कोटी मिळत होते. यात आता 500 कोटींपेक्षा अधिक रकमेने वाढ करण्यात आली आहे. यातूनच गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनामध्ये कोंढाळी शहरात राबविल्या जात आहेत. गरीबांसाठी घरे, आयुष्यमान आरोग्य योजना, सर्वांसाठी ÷अन्न, शेतकर्‍यांना बी बियाणांसाठी पैेसे, शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेतकर्‍यांच्या पिकाचा विमा अशा अनेक योजनांचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी चरणसिंग ठाकूर यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना हजारो मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

यासोबतच पालकमंत्र्यांनी आज काटोल आणि नरखेड तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये प्रचारसभा घेतली. त्यात बाजारगाव, लोहारीसावंगी, दावसा आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये प्रचारसभा घेऊन पालकमंत्र्यांनी हा भाग पिंजून काढला.