Published On : Sat, Apr 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

देशाच्या इतिहासात भाजपात आजपर्यंत कधीच फूट पडली नाही; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात विधान

Advertisement

नागपूर : भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इतरांच्या पक्ष फुटीसंदर्भात भाष्य करत स्वपक्षाचे कौतुक केले. तसेच,इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी, आत्मकेंद्री नेते असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे.जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. भारतात सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाचे आहेत,असे ते म्हणाले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपात कधीच फूट पडली नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. “देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही,असे फडणवीस म्हणाले. देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. यात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आघाडीवर आहे.

भाजपात फूट पडली नाही याचे एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते. ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कुणालातरी पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुणालातरी सत्तेची खुर्ची देण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही. एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आला, असेही फडणवीस म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.