Published On : Fri, Jun 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

… तर कोल्हापूर हिंसाचार पेटला नसता ; पोलिसांच्या दिरंगाईवर संशय, छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाचा आरोप

Advertisement

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाला.

राजर्षी शाहू महाराज यांचं शहर असलेल्या कोल्हापुरात काही समाजकंटकांनी शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शहराची सामाजिक सौंहर्द आणि शांतता बिघडवणाऱ्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती शाहू यांनी केला.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हा वाद होऊ नये म्हणून “मी स्वत: जिल्हाधिकारी, एसपी आणि आयजी यांना फोन करून यासंदर्भात माहिती दिली. मला जमलेल्या लोकांशी बोलण्याची परवानगी द्या जेणेकरून ते शांत होणार मात्र मला पोलिसांनी परवानगी दिली नाही. कदाचित त्यांना माझी मदत उपयुक्त वाटली नाही, असे छत्रपती शाहू म्हणाले.

ज्योतिबा पुळे आणि डॉ बी आर आंबेडकर यांच्यासमवेत महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सुधारणावादी परंपरेची त्रिसूत्री बनविणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखालील राज्य असलेल्या कोल्हापूरमध्ये दगडफेक आणि तोडफोड ही जातीय संघर्षाची दुर्मिळ घटना होती. लोकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगणारे संदेश प्रसारित करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, सकाळी 8.30 च्या सुमारास जमाव जमण्यास सुरुवात झाली आणि दोन तासांत ही संख्या अंदाजे 5,000 पर्यंत वाढली. नेतृत्वहीन जमाव नंतर हिंसक झाला, त्याने निवडक दुकानांवर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केली – यामुळे पोलिस कारवाई करण्यास मंद असल्याचा आरोप झाला.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये बजरंग दलाचे नेते बंड्या साळोखे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथे उपस्थित असलेला दुसरा मोठा गट उजव्या विचारसरणीचे नेते संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा होता – मिरज आणि भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या वेळी भिडेंचे नाव पुढे आले होते. हिंसाचारप्रकारणी पोलिसांनी आतापर्यंत 40 हून अधिक लोकांना अटक केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement