Published On : Sat, May 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

नरसाळा येथील पाण्याचा मोटार पंप अज्ञात चोराने केले चोरी

ग्रा प कर्मचारी च्या तक्रारीवरुन कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस आठ कि मी अंतरावरील गट ग्राम पंचायत नरसाळा येथील पाण्या चा मोटार पंप कोणेतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी पाणी पुरवठा कर्मचा-यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Gold Rate
03 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,100 /-
Gold 22 KT ₹ 1,12,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राप्त माहिती नुसार गट ग्राम पंचायत नरसाळा येथील पाणी पुरवठा कर्मचारी राजकुमार मनोहर वकलकर हा असुन गावातील पाण्याचा टाकी मध्ये असलेले सबमर्शिथल एल एन कंपनीचे मोटार पंप ५ एच पी किंमत अंदाजे ४,००० रूपयाची ही खराब झाल्याने दुरुस्ती करिता काढुन दुरूस्त करून रविवार (दि.१६) मे ला सायंकाळी ६ वाजता स्वीच रूम मध्ये ठेवुन घरी निघुन गेला. दुसऱ्या दिवशी सोमवार (दि. १७) मे ला सकाळी ७ वाजता दरम्यान राजकुमार वकालकर हा मोटार लावण्याकरिता गेला असता स्वीच रूम चे दार उघडे असुन कुलुप तुटलेले होते.

आणि स्वीच रूम मध्ये ठेवलेले मोटाप पंप दिसुन आले नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने स्वीच रूम चे कुलुप तोडुन दार उघडुन अंदर प्रवेश करित रूम मध्ये ठेवलेली मोटार पंप चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला राजकुमार मनोहर वकालकर यांच्या तोंडी तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Advertisement
Advertisement