कन्हान : – पिपरी गाडेघाट रोड वरील वरफडे यांच्या शेतातील विधृत खांब तोडुन पाच खाबांची जिवत एल्युमिनीयम तार १.५ कि मी किंमत ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल अञात चोरांनी चोरून नेली .
कन्हान पोलीस स्टेशन पासुन २ कि. मी. लांब पिपरी गाडेघाट रोड कडील शेतकऱ्याच्या शेती करिता असलेल्या विधृत लाईन चा भाऊराव वरफडे यांच्या शेतातील सोमवार (दि.१५) च्या रात्री विधृत सिमेंट खंबा तोडुन पाच विधृत खांबाची अल्युमिनिअम १.५ मी लांब जिवंत तारा किंमत ९१४४० रूपयाची अञात चोरांनी चोरून नेली . या विधृत तार चोरी मुळे विधृत खंडीत झाल्याने भाजीपाला पिकविणा-या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे.
याच परिसरात यापुर्वी चार वेळा विधृत तारांची चोरी झाली आहे परंतु चोर पकडण्यात येत नसल्याने चोराची दिवसेंदिवस हिंमत वाढत असून शेतकऱ्याला व विधृत मंडळाला नुकसान सहन करावे लागते.
यास्तव कन्हान पोलीसांनी योग्य कार्यवाही करून चोरांना पकडुन विधृत चोरीवर अंकुश लावण्याची मागणी शेतकरी भाऊराव वरफडे, अखाडु ठाकरे , रामा भोयर, ईश्वर ठाकरे , पवन ईखार, फाये , गुलाब ठाकरे हयानी केली आहे. कन्हान पोलीस स्टेशनला बुधवार (दि.१७) ला अञात चोरा विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे .