Published On : Tue, Apr 28th, 2020

कन्हानच्या बियर बार मध्ये ८० हजार रूपयाच्या विदेशी दारूची चोरी

कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील आंबेडकर चौक कन्हान येथील गौरव बीयर बार मध्ये दहा ते पंधरा बीयर व विदेशी दारूच्या पेट्या सहीत एकुण ८० हजार रूपयाच्या दारूची खिडकी तोडुन अज्ञात चोरानी चोरी केली.

कन्हान पोलीस स्टेशन पासुन एक कि.मी. लांब नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील आंबेडकर चौक जवळी ल गौरव बीयर बार मध्ये काम करणारा रोशन गौतम हा मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान बार च्या चारही बाजुला पाहणी केली असता मागच्या बाजुची खिडकी तोडल्याची दि सल्याने मालकाला माहीती देऊन बोला विले व पाहणी केल्याने चोरी झाल्याचे दिसल्याने राज्य उत्पादक शुल्क विभाग अधिकारी व पोलीसाना घटनेची माहीती देऊन घटानास्थळाची पाहणी केली अस ता मागील बाजुच्या खिडकीची लाकडी फ्रेम आतील लोखंडी ग्रिल तोडुन आत प्रवेश करून बीयरच्या सात पेटया, विदे शी दारूचा सहा पेटया अशा जवळपास पंधरा पेटया विदेशी दारू अदाजे किंमत ८० हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चो रानी नेऊन बार मध्ये चोरी केली.

घटस्थ ळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे निरि क्षक मुरलीधर कोडापे, मिलींद गायगोव ळी, चालक सुभाष शेंदरे, कन्हान पोलीस स्टेशनचे एपीआय अमितकुमार आत्राम, हे कॉ येशु जोसेफ, नरेश वरखडे, राजेंद्र पाली सह डी बी स्काट पोहचुन कार्यवा ही केली. बार मालक रमेश कुल्लरकर यांच्या तक्ररीवरून कन्हान पोलीस स्टेश नचे थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्ग दर्शनात पुढील तपास सुरू आहे.