Published On : Tue, Apr 28th, 2020

येरखेडा येथे अंगणवाडीतील जीवनावश्यक वस्तू साहित्याची चोरी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील येरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसरातील अंगणवाडी क्रमांक एक मधील इमारतीचे मुख्य प्रवेशद्वाराचे अज्ञात आरोपीने कुलूप तोडून जीवनावश्यक साहित्याची चोरी केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता सुमारास उघडकीस आली

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा अंगणवाडी क्रमांक 1 येथील अंगणवाडी सेविका भारती राजूरकर हया सकाळी 10 वाजता सुमसरास अंगणवाडीत गेल्या असता त्यांना अंगणवाडी इमारतीचे मुख्य प्रवेशदवाराचे कुलूप तुटून पडलेले दिसले व द्वार उघडे होते आत मध्ये बघितले असता विविध पोत्यांन मध्ये ठेवलेले तांदूळ, दाळ, तिखट, मीठ, तेल पॉकेट व ग्यास सिलेंडर अज्ञात चोरांनी 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे निदर्शनात आले .

घटनेची माहिती मिळताच यासंदर्भातील चोरीची तक्रार अंगणवाडी सेविका भारती राजूरकर यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी कलम 457,461 नुसार अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नके यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे


संदीप कांबळे कामठी