Published On : Thu, Feb 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मानकापूरमध्ये दोन दारूच्या दुकानांमध्ये चोरी; २.०३ लाखांचा ऐवज लंपास

Advertisement

नागपूर : मानकापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन दारू दुकाने फोडून रोख रक्कम व मद्यसाठा असा एकूण २ लाख ३ हजार १६५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

नुपूर वाईन शॉपचा व्यवस्थापक निखिल यशवंत वानखेडे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही चोरी ३ फेब्रुवारी रात्री १०.३० ते ४ फेब्रुवारी पहाटे ४.३० दरम्यान घडली. चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि १ लाख ८० हजार रुपये रोख, एक मोबाईल फोन, बिअर कॅन तसेच विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.

याचवेळी शेजारील ऑरेंज सिटी बिअर शॉपीलाही लक्ष्य करत चोरट्याने कुलूप तोडले आणि कॅश काउंटरमधील ६,५६५ रुपये लंपास केले.
या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५ (अ), ३३१(२), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, स्थानिक चौकशीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, परिसरातील दुकानदारांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.