Published On : Sat, May 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भावाच्या घरी गेलेल्या महिलेच्या घरी चोरी ; सोन्याचे दागिने लंपास

नागपूर : शहरातील कपिलनगर पोलीस हद्दीत असलेल्या दरवडे ले आऊट परिसरात घराला कुलुप लाऊन भावाच्या घरी गेलेल्या महिलेचे १.०२ लाखाचे सोन्याचे दागीने लंपास केल्याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, ज्योत्स्ना केशव मेश्राम (वय ५७, रा. धम्मज्योतीनगर, दरवडे ले आऊट) या ४ मे रोजी रात्री १० वाजता ते ५ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान आपल्या घराला कुलुप लाऊन भावाच्या घरी गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.

Gold Rate
16Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,27,600 /-
Gold 22 KT ₹ 1,18,700 /-
Silver/Kg ₹ 1,80,800/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतून १ लाख २ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. महिलेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement