Published On : Mon, Aug 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

युवकास पकडुन चौघानी मारून मोबाईल व खिश्यातील १४००० रू काढुन केली लुटमार

Advertisement

पोस्टे कन्हान येथे तिन आरोपी स्वत: सरेंडर तर एक आरोपी अद्याप फरार.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १ किमी किमी अंतरावर असलेल्या राजीक पान पॅलेस दुकाना समोर चार आरोपींतानी शिवम पुरी च्या गालावर झापड मारून त्यास हाता पायाने मारून त्याचा मोबा इल हिसकवुन त्याच्या खिशातुन १४,००० रूपये काढुन लुटमार केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्षा तक्रारी वरून पोस्टे ला चारी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.५) ऑगस्ट ला शिवम पुरी याला रिज्वान अनवर खान वय १९ वर्ष राह. पिपरी कन्हान हयाने कामावर लावल्याने दुपारी १:३० वाजता शिवम बलीराम पुरी हा खर्रा घोटण्याचा कामा करिता जितु पान पॅलेस येथे गेला आणि तिथे रात्री १०:३० वाजता पर्यंत खर्रा घोटण्याचे काम आटो पुन घरी जाण्या निघाला असता पान ठेल्यावर काम करणाऱ्या एका युवकाने शिवम पुरी यास आंबेडकर चौक येथे सोडले. तेथुन हा अशोक नगर मार्गाने घरी पायदळ जात असतांना राजीक पान पॅलेस दुकाना ज वळ १) शुभम सलामे २) अक्षय ३) तेनाली ४) प्रशांत या चार आरोपींनी शिवम पुरी यास पकडुन शुभम सलामे याने शिवम ची काॅलर पकडुन त्याच्षा गालावर झापड मारली असुन अक्षय, तेनाली, प्रशांत यांनी हाता पायाने मारले.

शुभम सलामे ने शिवम च्या हातातुन मोबाइल हिसाकुन आपल्या जवळुन चाकु काढुन तेनाली जवळ देऊन शिवम ला धमकावुन जितु ने दिले ले १४,००० रूपये खिश्यातुन काढुन घेतले. शुभम सलामे व तिघाही आरोपींनी शिवम ला पकडुन ठेवले असता निक्कु अन्ना याला शुभम सलामे ने आपल्या मोबाइल ने फोन केला असता निक्कु अन्ना याने म्हटले कि शिवम पुरी को छोड दो, उसका तुम्हारे झगडे में कोई हात नही है | असे म्हणुन निक्कु अन्ना ने फोन कट केला.

आरोपींनी शिवम पुरी याला चाकु दाखवुन धमकावुन लुटमार केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी शिवम पुरी याचा तोंडी तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला चारही आरोपी विरुद्ध कलम ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोली स स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील करीत आहे.

सदर प्रकरणाचे आरोपी शुभम सलामे, तेनाली व प्रशांत हे तिघे शनिवार (दि.६) ऑगस्ट ला दुपारी कन्हान पोस्टे ला स्वत येऊन जमा (सरेंडर) झाले आहे. तेनाली जवळ मोबाईल फोन मिळाला असुन मोबाइल ची सिम काढुन फेकली आहे. एक आरोपी अक्षय हा अद्याप फरार आहे.

Advertisement
Advertisement