Published On : Sat, Apr 14th, 2018

Video: मेट्रोच्या निर्माणाधिन पिलरच्या तळाशी कामगार फसला

नागपूर : शनिवारी दुपारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या समोर सुरू मेट्रोच्या निर्माणाधिन पिलरचे सेन्टरिंग काढताना एक कामगार तळाशी मातीच्या खोलगट भागात फसला. तात्काळ मेट्रोच्या क्विक ऍक्शन टीम आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

त्यांनी या घाबरलेल्या कामगाराला बाहेर काढले व शासकीय रुग्णालयात (मेडिकल) मध्ये दाखल करण्यात आले.

Advertisement

शहरात अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने मातीत ओलावा निर्माण झाला. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा सदर कामगाराने सुरक्षेसाठी असलेली क्रेन रोप आणि इतर कोणतीही खबरदारी घेतली नव्हती.

Advertisement
Advertisement
Advertisement