Published On : Sat, May 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील वानाडोंगरी येथील हत्याकांडाचा उलघडा; मित्रांनी दारूच्या वादातून केला तरुणाचा खून

Advertisement

नागपूर ; वानाडोंगरी परिसरात गुरुवारी रात्री तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.कुणाल ऊर्फ बॅटरी सुनील कन्हेरे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडाची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींना अटक केली.

संदीप खुणीलाल बोपचे (२४), कार्तिक उमेश मेश्राम (१९) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असून आयुष् हेमराज सुरसाउत (१९) व एक विधिसंघर्ष बालक या दोघांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.या घटनेतील एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेणे सुरु आहे.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपी हे कुणालचे मित्रच आहेत. सर्व जण सोबत दारू घेऊन वसंत विहारच्या पाठीमागे मोकळ्या लेआऊटमध्ये दारू पार्टी करू लागले . तिथे दारू पिताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. एकाने मोठा दगड कुणालच्या डोक्यावर मारला.

त्यामुळे तो आणखी चवताळला व त्यांना शिव्या देऊ लागला. तेव्हा आरोपींनी त्याला आणखी मारहाण करून त्याचा खून केला.हत्या केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व आरोपीना न्यायालयात हजर करत त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement