Published On : Mon, Aug 31st, 2020

रामटेक तालुक्यात एकून रुग्णाची संख्या 169.

Advertisement

रामटेक रामटेक तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून रामटेक तालुका हॉट स्पॉट ठरत आहे. कोरोना ला ब्रेक लागण्या ऐवजी दिवसेंदिवस कोरोनाचे प्रादुर्भाव वाढतच चालले आहे .

तालुक्यात 8 व शहरामधे 7 असे एकून 15 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यात शहरा मधील विनोबाभावे वार्ड येथे 1, राजाजी वार्ड मधे 3, शास्त्री वार्ड येथे 2 व आझाद वार्ड येथे 1 रुग्ण आहेत .
तालुक्यातील , मनसर येथे 5, शितलवाडी 2 व नगरधन येथे 1 अशे ऐकून 15

संक्रमित रुग्ण आढळून आले. तालुक्यात 90 व शहरामधे 79 असे एकुन 169 रुग्ण कोरोना संक्रमित मिळाले. त्यातील 76 लोक स्वस्थ झाले. तर तीन लोकांचा मृतु झालेला आहे.

संक्रमिताना रामटेकचा कोव्हीड केअर सेंटर मधे पाठवींन्यात आले आहे. तहसीलदा बाळासाहब मस्के , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.