Published On : Fri, May 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भारत-पाक संघर्षात ‘नागास्त्र’चे तांडव; नागपुरात बनलेले ड्रोन पाकिस्तानसाठी ठरले घातक !

नागपूर – ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानवर केलेल्या जोरदार ड्रोन हल्ल्यात नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजने तयार केलेल्या ‘नागास्त्र’ ड्रोनचा वापर करण्यात आला. हे यशस्वी मिशन भारतीय लष्करासाठी ‘नागास्त्र’ हे एक प्रभावी आणि विश्वासार्ह शस्त्र म्हणून सिद्ध झाले आहे.

या ऐतिहासिक योगदानाबद्दल लोकमतचे एडिटोरियल बोर्ड चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी सोलार इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्याशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नुवाल यांनी सांगितले की, “भारतीय सेनेला आमच्या विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे पाहून अभिमान वाटतो.”

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विशेष म्हणजे, डिसेंबर २०२४ मध्ये भारतीय लष्कराने ‘नागास्त्र-१’ अधिकृतरित्या स्वीकारले होते. हे युद्धाच्या तयारीत महत्त्वाचे टप्पे मानले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागास्त्रला भेट-
३० मार्च २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस युनिटला भेट देऊन, विविध ड्रोन प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी लोइटरिंग म्युनिशनसाठी खास रनवे आणि टेस्टिंग रेंजचे उद्घाटन करण्यात आले. मोदींनी ‘नागास्त्र-३’ या प्रगत कामिकेज ड्रोन सिस्टीमचे प्रात्यक्षिकही पाहिले, जे त्यावेळी प्रोटोटाइप टप्प्यात होते.

नागास्त्रची वैशिष्ट्ये: शत्रूला धक्का देणारे शस्त्र-
१०० किमी रेंज
५ तास सलग उड्डाणाची क्षमता
छुपा हल्ल्याची क्षमता, जेणेकरून शत्रू सतर्क होत नाही
रिअल टाईम व्हिडिओ ट्रान्समिशन
पॅराशूट रिकव्हरी सिस्टीम, म्हणजेच मिशन रद्द झाल्यास ड्रोन सुरक्षित परत आणता येतो.

Advertisement
Advertisement