Published On : Thu, Feb 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची ताकद वाढणार,आप-काँग्रेसमधील आघाडी पक्की ; जागावाटपाचा फॉर्मुलाही ठरला !

Advertisement

नागपूर : मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोट बांधली आहे. राज्य स्तरावरही आघाडीतील पक्षांनी हातमिळवणी करत सरकारविरोधात कंबर कसली. उत्तर प्रदेशनंतर सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये दिल्लीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत एकमत झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यातील आघाडीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून अखेर गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले आहे. दिल्लीतील लोकसभेच्या ४ जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढू शकतो. तर लोकसभेच्या तीन जागा काँग्रेसला देण्यात येतील. सध्या दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. विधानसभेत आम आदमी पक्षाचा मोठा विजय होत असला तरी दिल्लीतील मतदार २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या मागे उभे राहिले होते. त्यामुळे यावेळी एकत्र लढून भाजपाला रोखण्याचा आप आणि काँग्रेस सज्ज झाली आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील जागावाटपाबाबत सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार आप नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार आहे. तर काँग्रेस पूर्व दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली आणि चांदनी चौकमध्ये आपले उमेदवार उतरवणार आहे. त्याबरोबरत आम आदमी पक्ष गुजरातमधील भरूच आणि भावनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देईल. त्याशिवाय हरियाणामधील एका मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. तर चंडीगडचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात येईल.

Advertisement
Advertisement