Published On : Mon, Oct 30th, 2017

भावसार समाजाचा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा थाटात

Advertisement

नागपूर : नागपूर भावसार महिला मंडळ व नागपूर भावसार युवा परिषद यांच्या सहकार्याने नागपूर भावसार समाज पंचकमेटी यांच्या वतीने येथील संताजी सभागृहात आयोजित राज्यस्तरीय अनुरुप उपवर-वधू परिचय मेळावात थाटात पार पडला. राज्यातील समाजबांधवांसोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातील समाजबांधवांचीही यावेळी उपस्थिती होती.

मेळाव्याचे उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महासभेचे केंद्रीय अध्यक्ष समाजभूषण महादेवराव पतंगे होते. आमदार सुधाकर कोहळे, मनपा हनुमाननगर झोनचे सभापती भगवान मेंढे, किसन गडाले, समाजभूषण देवराव फुलझेले, महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष राजेश कळमकर, योगेंद्र वर्णे, महाराष्ट्र भावसार महिला परिषदेच्या अध्यक्षा शुभांगी खनके, समाजसेवक बाबूराव वंजारी, गिरीश बुलबुले, विदर्भ भावसार समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय जिराफे, यज्ञेश कपले, स्वागताध्यक्ष नरेंद्र पेरकर, आयोजक सुभाष गोजे, दीपा लखपती, माजी नगरसेवक अशोक काटले, राजेश खार्वे, रघुनाथ अंबोरे, डॉ. रोहिणी कळमकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, भावसार समाजाचे नागपुरातील कार्य इतर समाजांनी प्रेरणा घ्यावे, असेच आहे. भावसार समाजाच्या समाजकार्यात जेवढी मदत आपल्याला करता येईल, ती सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, भावसार समाजाशी मी अगदी प्रारंभापासून जुळलेला आहे. त्यांच्या प्रत्येक आयोजनात मी सहभागी असतो. हुडकेश्वर परिसरातील समाजभवनाची जागा आहे. तेथे भावसार समाजभवन उभारण्यात जी मदत आमदार या नात्याने करता येईल, ती करीन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रास्ताविकात आयोजक सुभाष गोजे यांनी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजनामागील भूमिका विषद केली. दर तीन वर्षांनी नागपुरात सदर मेळावा आयोजित करण्यात येत असून यंदा सुमारे ७०० उपवर-वधू यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजभूषण देवराव फुलझेले यांनीही भावसार समाज पंचकमेटी कार्याचा लेखाजोखा आपल्या भाषणातून मांडला. अन्य मान्यवरांचीही यावेळी भाषणे झालीत.

तत्पूर्वी परिचय मेळाव्याच्या निमित्ताने उपवर-वधूंची माहिती असलेल्या ‘अनुरूप’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील तरुण वैज्ञानिक शालिनी मुधोळकर हिचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

उद्‌घाटन कार्यक्रमानंतर उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. सदर मेळाव्यात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement