Published On : Fri, Sep 11th, 2020

जनता कर्फ्यू ला पहिल्या दिवशी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Advertisement

कोरोना चा प्रतिबंध करता यावा म्हणून केली कोरोना विषयी जनजागृति.

पोलिसांचा चोख बंदोबस्त.

रामटेक: रामटेक शहर व्यापारी मंडळ चा वतीने ३ दिवसीय जनता कर्फ्यू निमित्य रामटेक शहर व्यापारी मंडळ तसेच रामटेक नगराचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख साहेब , उपाध्यक्ष आलोक मानकर, नगरसेवक संजय बिसमोगरे, प्रवीण मानापुरे यांनी रामटेक शहरात फिरून कोरोना विषयी जनजागृती केली.

कोरोना चा प्रतिबंध करता यावा म्हणून व्यापारी संघाच्या वतीने मेडीकल दुकाने सोडून संपूर्ण दुकाने आणि भाजीमंडी बंद होती. प्रत्येक चौकात पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.

Advertisement

यावेळी या ३ दिवसीय जनता कर्फ्यु ला पहिल्या दिवशी संपूर्ण रामटेक शहरातील व्यापाऱ्यांनी व जनतेने उत्कृष्ठ प्रतिसाद दिल्याबद्दल व्यापाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.