Published On : Mon, Feb 22nd, 2021

कामठी नगर परीषद च्या विशेष सभेत विषय समितिसंदर्भात ठराव एकमताने मंजूर

संदीप कांबळे कामठी


कामठी :-कामठी नगर परीषद च्या विषय समिति चे सभापति व् सदस्य विषयावर पीठासीन अधिकारी एसडीओ श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परीषद सभागृहात आज 22 फेब्रुवरिला दुपारी 1 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत 26 निर्वाचित सदस्य व् 3 नामनिर्देशित सदस्य पैकी 1 नामनिर्देशित सदस्य असे एकुन 27 सदस्य उपस्थित होते.

या सभेत स्थायी समिति सदस्य संख्या निश्चित करने,विषय समितित कोणत्या समित्याचा समावेश असावा, सदस्य संख्या निश्चित करने,तसेच विशेषता उपाध्यक्ष हा कोणत्या समितिचा पदसिद्ध सभापति असावा याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच विशेषता उपाध्यक्ष अहफाज अहमद यांना नियोजन तथा विकास समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून ठेवण्यात यावे ही बाब सर्वानुमते मंजूर करण्यात आले तर या सभेत 6 विषय समितीच्या सभापति पदाची निवडणूक ही 26 फेब्रुवरिला दुपारी 4 वाजता कामठी नगर परिषद सभागृहात होणार आहे असे सांगण्यात आले असून .आजच्या सभेत विषय समितीचे सदस्य ठरविन्यात आले.

कामठी नगर परीषद ही ‘ब ‘वर्ग नगरपरिषद असून 32 सदस्य संख्या व् 3 नामनिर्देशित सदस्य असून यामध्ये सत्ताधारि पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस गट असून या पक्षाचे गटनेता मो शाहजहा शफाअत अहमद आहेत व् या गटात 21 सदस्यांचा समावेश आहे तसेच विरोधी गट म्हणून भारतीय जनता पार्टी व् बरिएम युति गट आहे ज्यामध्ये 11 सदस्य असून गट नेता नगरसेविका सुषमा सुनील सिलाम आहेत.,या सदस्य संख्यानुसार विषय समितीच्या सभासद संख्या ही पालिका एकुन सदसयांच्या 1/4,म्हणजेच 8 पेक्षा कमी किंवा 1/3 म्हणजेच 11 पेक्षा अधिक राहणार नाही तसेच महिला व बाल कल्याण समितीवर तिच्या सदस्य संख्येच्या किमान 75 टक्के म्हणजेच 7 सदस्य हे महिला सदस्यमधून राहतील यानुसार विषय समितित 9 सदस्य राहनार असल्याचे निश्चित करण्यात आले ज्यामध्ये कांग्रेस चे 6 व् बीजेपी बरिएम युतीचे 3 सदस्य निश्चिती करण्यात आले.यानुसार स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत राहणार व् नियोजन तथा विकास समितीच्या सभापति पदी उपाध्यक्ष अहफाज अहमद राहनार आहेत.तर या 6 विषय समितीच्या सभापति पदाची निवडणूक ही 26 फेब्रुवरिला होणार आहे.या 6 विषय समितिमध्ये सार्वजनिक बांधकाम समिति,शिक्षण क्रीड़ा व् सांस्कृतिक कार्य समिति,स्वच्छता ,वैद्यक व् सार्वजनिक आरोग्य समिति, पानीपूरवठा व् जलनिस्सरण समिति ,नियोजन अणि विकास समिति ,महिला व् बाल कल्याण समिति चा समावेश राहणार आहे.


यानुसार सार्वजनिक बांधकाम समितीत कांग्रेस गटाचे रमा नागसेन गजभिये, अन्सारी सुरेय्या बेगम मो नासिर , मुस्तक अहमद अब्दुल शकुर, शाहिदा बेगम अन्सारी, मोहसिनूर रहमान साफोया कौसर,मंमता राजेश कांबळे,तर भाजप बरीएम गटातून राजू पोलकंमवार, पिंकी रमेश वैद्य, स्नेहलता गजभिये चा समावेश आहे.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीत मो आसिफ अब्दुल गफ्फार, मुस्तक अहमद अब्दुल शकुर, शाहिदा बेगम अन्सारी, आलिया तब्बसुम अमीन रशीद, मो अक्रम, मंदा चिमनकर तसेच भाजप बरीएम गटातील स्नेहलता गजभिये, संध्या उज्वल रायबोले, संजय मुन्नालाल कनोजिया चा समावेश आहे.

स्वच्छता समितीमध्ये कांग्रेस गटातील मीनाक्षी बुरबुरे, सुरेय्या बेगम अन्सारी, मोहसिनूर रहमान साफिया कौसर, वैशाली मानवटकर, मंदा चिमणकर, निरज लोणारे, तसेच भाजप बॅरिएंम गटातील संजय कनोजिया, लालसिंग यादव, धर्मपाल मानवटकर,चा समावेश आहे.

पाणीपुरवठा समितीत कांग्रेस गटातील रघुवीर मेश्राम, मंदा चिमनकर, मुस्तक अहमद, आलिया तब्बसुम, वैशाली मानवटकर, मोहम्मद अक्रम, तर भाजप बरीएम गटातील प्रतीक पडोळे, सरोज रंगारी, धर्मपाल मानवटकर, चा समावेश आहे.

नियोजन तथा वीकास समिती चे पदसिद्ध सभापती हे उपाध्यक्ष राहणार असून यामध्ये कांग्रेस गटातील अब्दुल मतीन खान, उबेद सईद अफरोज, काशीनाथ प्रधान, मो अक्रम, वैशाली मांनवटकर तर भाजप बरीएम गटातून प्रतीक पडोळे, लालसिंग यादव,, हर्षा यादव, चा समावेश आहे.

महिला व बाल कल्याण समितो मध्ये शहणाज अंजुम अतिकुर रहमान, आलिया तब्बसुम, सुरेयया बेगम अन्सारी, ममता कांबळे, शाहिदा बेगम अन्सारी, मोहसीननुर रहमान साफिया कौसार, तर भाजप बरीएम गटातून पिंकी वैद्य, संध्या रायबोले, हर्षा यादव चा समावेश आहे.

स्थायी समीतीमध्ये अब्दुल मतीन खांन,उबेद सईद अफरोज, सुषमा सीलाम चा समावेश आहे.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी एसडिओ श्याम मदनूरकर होते तर मुख्याधिकारी संदीप बोरकर, उपमुख्यअधिकारी नितीन चव्हाण ,नगराध्यक्ष मो शाहजहा शफ़ाअत, उपाध्यक्ष अहफाज अहमद तसेच नगरसेवक काशीनाथ प्रधान,नीरज लोणारे, प्रतीक पडोळे, मंदा चिमनकर, संध्या रायबोले, रमा नागसेन गजभिये, ममता कांबळे, लालसिंग यादव, संजय कनोजिया, यासह एकूण निर्वाचित सदस्य व् नामनिर्देशित सदस्य एकमेव रमेश दुबे असे एकुन 27 सदस्यांची उपस्थिति होती