Advertisement
मुंबई : मुंबईची रहिवासी असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अन्वी कामदार (२७) हिचा महाराष्ट्रातील रायगडजवळील कुंभे धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करताना दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्वी एक प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर होती आणि मुख्यतः ट्रॅव्हल संबंधित व्हिडीओ बनविण्यासाठी ती प्रसिद्ध झाली होती.
मंगळवारी आपल्या मैत्रिणींसोबत रीलचे चित्रीकरण करत असताना अन्वी कामदार ३५० फूट दरीत पडली.अन्वी ७ लोकांसोबत पिकनिकसाठी गेली होती. सहा तासांच्या बचावकार्यानंतर अन्वी कामदारला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.रील बनवत असताना अचानक तिचा पाय घसरल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.